ramai awas yojana 2024 या योजनेंतर्गत कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, त्यासाठी कसा अर्ज करू शकतो. याची सविस्तर माहिती या पोस्ट मध्ये पाहणार आहोत.
या योजनेचा सर्व कारभार हा ग्राम विकास विभागामार्फत राबविला जातो.रमाई आवास योजनेच्या माध्यमातून जो लाभार्थी व्यक्ती आहे त्याला १३२००० ते 2.५० लाख एवढी रक्कम त्य व्यक्तीला पक्के घर बांधण्यासाठी या योजनेतून आर्थिक साहाय्य केले जाणार आहे.अनुसूचित जाती जमाती आणि नवबौद्ध समाजासाठी या योजनेतून सहाय्य केले जाणार आहे.यामार्फत ज्या व्यक्तीचे घर बांधण्यासाठी आर्थिक परिस्तिथी नाही किंवा त्यांची पक्की घरे नाहीत त्यांना सदर योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य महाराष्ट्र शासनाकडून केले जाते.
सदर योजनेची स्थापना महाराष्ट्र शासनाने १५ नोव्हेंबर २००८ शासन निर्णय झाला.ग्रामीण भागात तसेच शहरी भागातील लोकांचे राहण्याची समस्या असल्याने त्यांची राहण्याचा तसेच निवाऱ्याचा प्रश्न सुटावा तसेच त्यांचे राहणीमान उंचावेल या हेतूने या योजनेंतर्गत लाभ मिळणार आहे.
रमाई आवास घरकुल योजना २०२४,यामध्ये कोणकोणत्या गोष्टी म्हणजे योजना काय आहे,निवड प्रक्रिया, योजनेच्या अटी शर्ती ,पात्रता ,योजनेसाठी अर्ज कसा करायचा,लाभार्थी लिस्ट कशी बघायची त्यासाठी लागणारी process यासंदर्भात संपूर्ण माहिती सविस्तर या लेखा मध्ये आपण पाहणार आहोत.
१ | राज्य | महाराष्ट्र |
२ | शासन निर्णय | १५ नोव्हेंबर २००८ |
३ | अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन /ऑफलाईन |
४ | अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
प्रधान मंत्री सुर्यघर योजना २०२४ मिळणार ५०% अनुदान
रमाई आवास घरकुल योजना २०२४ ,काय आहे.
- अंमलबजावणी –रमाई आवास घरकुल योजना २०२४ ,अनुसूचित तसेच नवबौद्ध संवर्गातील कुटुंबाचा राहण्याचा निवार्याचा त्यांचे राहणीमान उंचावणे यासारखे प्रश्न सोडवण्यासाठी २००९ ,२०१० या सालापासून या योजनाची अंमलबजावणी करण्यात आली.
- योजना राबवणे -ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील संबधित लाभार्त्याच्या स्वताच्या जागेवर ,किंवा काचे घर आहे त्या ठिकाणी नवीन पक्के घर बांधण्यासाठी किमान २६९ चौरस फुटाचे पक्के घर बांधण्यासाठी ग्रामीण भागातील संबधित अधिकार्याशी आणि शहरी भागातील नगरपरिषद,नगरपालिका,महानगरपालिका या स्थानिक भागातील यंत्रणेमार्फत हि योजना राबवली जाते.
- लाभार्थी निवड-सदर योजनेसाठी लाभार्त्याची निवड हि जात पडताळणी तसेच २०११ च्या जातीनुसार घराच्या पडताळणी नुसार घराच्या गर्जेनुसार हि ग्रामसभेमध्ये निवड केली जाते.ग्रामीण भागात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येतो आणि शहरी भागातील दारिद्र्य रेषेवरील असणार्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.
- अनुदानित रक्कम- पात्र लाभार्थी हा ग्रामीण भागातील असेल तर त्याला १३२००० /-एवढी रक्कम म्हणून अर्थ सहाय्य केले जाते.डोंगराळ,नक्षल ग्रस्त अशा ठिकाणी १४२००० तसेच शहरी भागात नगरपालिका ,महानगरपालिका ,नगरपरिषद ,मुंबई विकास प्राधिकरण क्षेत्र याठिकाणी २.५०लाख एवढी रक्कम अर्थ सहाय्य म्हणून दिली जाते.
- अपंगत्व असल्यास -संबधित व्यक्ती 40% अपंग असेल तर त्या व्यक्तिला या योजनेचा लाभ घेता येतो.
ramai awas yojana 2024, योजनेचा उद्देश
- रमाई आवास घरकुल योजना२०२४ अंतर्गत अनुसूचित जमाती तसेच नवबौद्ध संवर्गातील समाजाला पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
- निवार्यासाठी पक्की व सुरक्षित घरे बांधून देणे.
- संबधित प्रवर्गाचे राहणीमान उंचावण्यासाठी मदत होईल.
- संबधित प्रवर्गाला त्यांच्या स्वताच्या जागेवर किंवा कच्या घराच्या जागेवर नवीन पक्के घर बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून अर्थ सहाय्य केले जाते.
- संबधित प्रवागाकडे किमान २६९ चौरस फुट जागा असणे गरजेचे आहे.
रमाई आवास घरकुल योजना२०२४,लाभार्थी
- रमाई आवास घरकुल योजना यासाठी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील व्यकी असणे गरजेचे आहे तरच तो यासाठी लाभार्थी म्हणून पात्र होईल.
- सर्वसाधारण क्षेत्रात संबधित व्यक्ती दारिद्र रेषेखालील असणे गरजेचे आहे.
- शहरी भागात दारिद्र्य रेषेवरील असेल तरी चालेल.
- संबधित लाभार्थी हा 40% अपंग असेल तर तो या योजनेसाठी पात्र असेल.
ramai awas yojana 2024
आवश्यक कागदपत्रे
- संबधित व्यकी हि योजनेसाठी पात्र असणार्या जातीमधील असणे आवश्यक आहे.
- संबधित व्यकी खरच दारिद्र्य रेषेखाली आहे हि पाहण्यासाठी त्याचा उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
- संबधित व्यकीचे बँकेत आधारलींक असलेले खाते असणे आवश्यक आहे.
- मतदान ओळखपत्र
- आधारकार्ड
- पॅनकार्ड
- संबधित व्यकीचे जमिनीचा ८ अ उतारा.
- संबधित व्यकीचे घराचे लाईट बिल किंवा घर पट्टी याची पूर्तता करणे गरजेचे आहे.
रमाई आवास घरकुल योजना२०२४, अटी व शर्ती
- रमाई आवास घरकुल योजना२०२४, या योजनेसाठी संबधित व्यकी हा अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध प्रवर्गातील असणे गरजेचे आहे.
- संबधित व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा किमान १५ वर्ष रहिवाशी असणे गरजेचे आहे.
- रमाई आवास घरकुल योजना२०२४, या योजनेचा एकाच कुटुंबात एकदाच लाभ घेता येतो.
- लाभार्थ्याने इतर कोणत्याच गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- अनुसूचीत जातीमधील आहे आणि दारिद्र्य रेषेवरील आहे आणि तो लाभार्थी 40% अपंग असेल तर या योजनेचा संपूर्ण अटी शर्ती पूर्तता केल्यास लाभ मिळू शकतो.
- रमाई आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी वरील सर्व अटी शर्ती पूर्तता करावी लागेल.
ramai awas yojana 2024 योजनेंतर्गत मिळणारा लाभ
- रमाई आवास योज्नेअनर्गत मिळणारे अनुदान हे ग्रामीण भागासाठी १३२०००/- जाहीर करण्यात आली आहे.
- डोंगराळ तसेच नक्षलग्रस्त भागासाठी एकून १४२०००/- एवढी रक्कम अनुदानासाठी पात्र आहे.
- रमाई आवास घरकुल योजनेतून शहरी भागात म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका,मुंबई प्राधिकरण क्षेत्रातील भागात एकूण २५००००/- एवढे अनुदान देण्यात आले आहे.
- रमाई आवास घरकुल योजनेतील लाभार्त्या कडून लाभार्थी हिस्सा देणे बंधनकारक आहे तो ज्यात्या भागानुसार वेगवेगळा आहे.
- ग्रामीण भागासाठी लाभार्थी हिस्सा आकारला जात नही
- नगरपालिका/महानगरपालिका या ठिकाणी 7.5% एवढा आकारला जातो.
- महानगरपालिका प्राधिकरण क्षेत्रासाठी 10% एवढा लाभार्थी हिसा आकारला जातो.
रमाई आवास घरकुल योजना२०२४ योजनेंतर्गत मिळणारे अनुदान, उत्पन्न मर्यादा, लाभार्थी हिस्सा
अ. क्र. | क्षेत्र | उत्पन्न मर्यादा | मिळणारे अनुदान | लाभार्थी हिस्सा |
१ | ग्रामीण विभाग | १.२ लाख | १३२००० | निरंक |
२ | डोंगराळ/नक्षलग्रस्त | १.२ लाख | १४२००० | – |
३ | नगरपालिका /महानगरपालिका | ३.० लाख | २५०००० | ७ .५ % |
४ | महानगरपालिका प्राधिकरण क्षेत्र | २.० लाख | २५०००० | १० % |
ramai awas yojana 2024, योजनेसाठी इतर योजनेच्या माध्यमातून लाभ मिळत आहे.
- पंडित दीनदयाळ घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना ग्रामविकास विभाग शासन निर्णय ३०-१२-२०१५ अंतर्गत रमाई आवास योजनेतून ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील पात्र असणार्या लाभार्त्याला परंतु जागा उपलब्ध नसणार्यांना जागा खरेदी करण्यासाठी ५००००/- एवढी रक्कम त्या लाभार्त्याला मिळते.
- रमाई आवास घरकुल योजना २०२४ माध्यमातून लाभार्त्याला ९० दिवसाचा महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार मिळणार आहे.
- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शोचालाय उभारण्यासाठी १२००० एवढी रक्कम अर्थ सहाय्य म्हणून दिली जाते.
वरील वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून पात्र उमेदवाराला वरील सांगितल्या प्रमाणे अर्थ सहाय्य केले जाते.
ramai awas yojana 2024,अर्ज कसा करायचा?
online
- रमाई आवास घरकुल योजना २०२४ योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
- तुमच्या समोर वेबसाईट चे मुख पृष्ट दिसेल तिथे तुम्हाला नगर पंचायत ,म्हणजे तुमचा कोणत्या भागात येतो ते त्या ठिकाणी नमूद करा.
- नंतर रमाई आवास योजना या वर क्लिक करा .
- तुमच्या समोर फॉर्म येईल त्या फॉर्म मध्ये तुमची वयक्तिक सर्व माहिती सविस्तर बारा.
- लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करा माहिती भरून झाल्यावर फॉर्म सबमिट करा.
offline
- रमाई आवास घरकुल योजना२०२४ योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तुमी कोणत्या विभाग आहे म्हणजे ग्रामीण भागात किंवा शहरी भागात.
- ग्रामीण भागात असेल तर ग्रामपंचायत मध्ये सदर योजनेचा फॉर्म घेऊन कागदपत्रे जोडावी.
- शहरी भागात असेल तर तुम्ही नगरपालिका ,महानगरपालिका याठिकाणी सदर योजनेचा फॉर्म घेऊन कागदपत्रे जोडावी.