e pik pahani maharashtra 2024
e pik pahani maharashtra 2024, यामध्ये पिक पेरा कसा भरायचा, पिक पेरा किती तारखे पर्यंत भरायचा, याची संपूर्ण माहिती सविस्तर पाहणार आहोत.
e pik pahani maharashtra 2024, काय आहे?
“ई पिक पाहणी” महाराष्ट्र २०२४,यामध्ये आपण शेतकर्यासाठी या पिक पाहणीचा वापर कसा करायचा आहे.त्याचबरोबर त्यामध्ये कालावधी ,पडताळणी असे विविध पायऱ्या आहेत त्या सर्व या ब्लॉग post मध्ये बघणार आहे.
e pik pahani करताना संबधित शेतकऱ्याला त्याचा वेळ,याच्या घालाव्या लागणाऱ्या हेलपाटे याच्यापासून सुटका होणार आहे.e pik pahani पेरा भरण्यासाठी यामुळे सुलभ होणार आहे. ई पिक पाहणी एप मुळे पिक पेरा मध्ये अधिक पारदर्शकता आणि सुलबतेने काम होणार आहे.
या post मध्ये e pik pahani मुळे होणारे फायदे ,याची उद्धीष्टे ,पिक पेरा कसा भरायचा याची प्रोसेस यामध्ये सविस्तर बघणार आहे.
e pik pahani nondani कशी करायची ?
“ई पिक पाहणी”महाराष्ट्र २०२४, यामुळे शेतकऱ्याला nondani करण्यासाठी संबधित तलाठी कार्यालयात जाऊन त्या अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याची गरज नाही.ई पिक पाहणी एप च्या सहाय्याने संबधित शेतकऱ्याला त्याच्या शेताच्या बांधावर उभ राहून स्वताचा पिक पेरा स्मार्टफोनच्या सहाय्याने नोदावता येणार आहे.
e pik pahani ,उद्धीष्टे
e pik pahani,करताना संबधित शेतकऱ्याला विविध प्रकारे लाभ मिळावा आणि त्यामध्ये सोयीस्कर पद्धत अवलंब करता यावा, याची वेगवेगळी उद्धीष्टे आहेत. ते खालीलप्रमाणे
- शेतकरी सुलभता –शेतकऱ्याला त्याचा पिक पेरा नोंदवण्यासाठी कोणत्याही अधिकारी किंवा कार्यालयात न जाता स्वतः भरायचा आहे. यामुळे वेळ आणि श्रम याच्यात बचत होणार आहे आणि त्याच्या कामाला गती मिळण्यास मदत होणार.
- पारदर्शकता –“ई पिक पाहणी” हि सर्व ऑनलाईन प्रोसेस आहे, यामध्ये अधिक सत्यता दिसून चुकीच काही करू शकत नाही
- माहिती जतन – संबधित शेतकर्याने पिक पेरा डिजिटल प्रकारे नोंदवल्याने त्या शेतकऱ्याचा संपूर्ण डाटा सरकारकडे जतन होईल आणि सरकारला नवीन योजना अमलात आणल्यास याचा फायदा सरकारला होईल.
- सरकारी योजनाचा लाभ –पिक पेरा नोंद असल्याने संबधित शेतकऱ्याला नवीन सरकारी योजनाचा लाभ मिळण्यास सुलभता येईल आणि शेतकऱ्याला जास्त धावपळ न करता सरकारी योजना लाभ मिळेल.
- आधुनिकीकरण –कोणत्या क्षेत्रात किती प्रमाणात जास्त पिक पेरा आहे त्या संबधित क्षेत्रात कोणत्या आधुनिक तंत्रज्ञान आवश्यक आहे .तेथे त्या यंत्राची पूर्तता करता येणार.याने शेती क्षेत्रात आधुनिकीकरणाला चालना मिळेल.
ई पिक पाहणी,फायदे
“ई पिक पाहणी”,शेतकऱ्याला विविध प्रकारे फायदे मिळणार आहेत .ते खालीलप्रमाणे
- शेतकऱ्यासाठी सोयीस्कर –“ई पिक पाहणी” मुळे शेतकऱ्याचा पिक पेरा नोंदविण्यासाठी अधिकारी किंवा तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. शेतकरी स्वतःचा पिक पेरा त्याच्या शेताच्या बांधावर जाऊन त्याच्या मोबाईल फोनवर भरायला सोयीस्कर होणार आहे.
- वेळेची बचत –“ई पिक पाहणी” हि ओनलाइन प्रक्रिया असून शेतकर्याची वेळेची बचत होऊन त्याच्या कामाला गती मिळणार आहे.
- पारदर्शकता –“ई पिक पाहणी” हि ओनलाइन प्रक्रिया असून यामध्ये दोन न. कोणतीही चलाकी चालणार नाही यामध्ये अधिक सत्यता पाहायला मिळणार आहे.
- डाटा सेव-शेतकऱ्याचा डाटा सरकारकडे डिजिटल स्वरुपात जतन होणार असून येणाऱ्या काळात एखाद्या योजनेची अंमलबजावणी करताना सरकारला आणि शेतकऱ्याच्या फायद्याचे आहे.
- सरकारी योजनेचा लाभ –सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्याचा पिक पेरा महत्वाचा आहे. ई पिक पेरा सरकारकडे जतन असल्याने शेतकऱ्याला अचानक धावपळ करावी लागणार नाही.
e pik pahani maharashtra 2024 last date
शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे कि,खरीप हंगामाची अंतिम तारीख हि “१ ऑगस्ट ते १५ सप्टेम्बर” पर्यंत वाढवलेली आहे.आणि शेतकरी स्तरावरील कालावधी हा वर्षभरासाठी असणार आहे.
ई पिक पाहणी,पडताळणी
ई पिक पाहणी करताना संबधित अधिकारीकडून सविस्तर माहिती घेण्यात येते. त्याची काही टप्पे असतात ते खालीलप्रमाणे.
- पिक निवडणे –ई पिक पाहणीशेतकऱ्याने केल्यावर संबधित अधिकारी त्या पिकाची वर्गीकरण करून पिकाची निवड केली जाते. संबधित शेतकऱ्याला त्याची पूर्व कल्पना देण्यात येते.
- पूर्वकल्पना देणे –शेतकऱ्याने पिक पेरा नोंदवला असेल तर त्याची पडताळणी करण्यासाठी अधिकारी अमुक तारखेला येणार आहेत याची शेतकऱ्याला पूर्वकल्पना देण्यात येते जेणेकरून शेतकरी त्या वेळेत हजार राहील.
- स्थळाला भेट –पिक पेरा भरला आहे त्या शेतकऱ्याला पूर्व कलपना देऊन संबधित शेतकऱ्याच्या जमिनीला भेट देण्यात येते. कारण नोंदवलेला आणि प्रत्यक्ष शेतात काय आहे याची माहिती घेण्यासाठी अधिकारी त्या ठिकाणाला भेट देतात.
- नोंद करणे – संबधित क्षेत्राला भेट देऊन अधिकारी पेरलेला पेरा आणि प्रत्यक्षात काय आहे याची नोंद करण्यात येते.
- असमानता-अधिकारी संबधित शेतकऱ्याच्या शेतात गेल्यावर पेरलेला पेरा आणि नोंदवलेला पेरा याच्यात तफावत आढळल्यास शेतकऱ्याकडून त्याचा जबाब नोंदवला जातो.आणि त्यावर कारवाई करता येते.
संपूर्ण माहिती घेतल्यावर संबधित अधिकारी त्य शेतकर्याची केलेला पेरा योग्य ,अयोग्य याची नोंद करण्यात येते .अशा प्रकारे पडताळणीची प्रोसेस पूर्ण होते. पडताळणी झाल्यावर प्रत्यक्ष कालावधी हा त्या क्षेत्र ते ठिकाण यावर अवलंबून असते
कालावधी हा काही आठवडे ते काही महिने सुद्धा लागू शकतात.संबधित अधिकारि येणार अशी पूर्व कल्पना तुम्हाला मिळेल.नंतर अधिकारी आल्यावर शेतकऱ्यांनी स्वतः जवळ संबधित जम्नीचा 7/12 असणे गरजेचे आहे .अधिकारी जे प्रश्न विचारतील त्याची योग्य उत्तर देणे बंदनकारक आहे.
हे हि वाचा नमो शेतकरी योजना
पी एम किसान ट्रक्टर योजना
e pik pahani maharashtra 2024,आवश्यक कागदपत्रे आणि सामग्री
ई पिक पाहणी करताना संबधित शेतकऱ्याला पिक पेरा भरण्यासाठी कोणकोणती सामग्री आवश्यक आहे.ते पुढीलप्रमाणे.
- संबधित शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- पिक पेरा भरताना त्या शेतकऱ्याजवळ संबधित जमिनीचा 7/12 किंवा ८अ चा उतारा असणे गरजेचे आहे.
- शेतकऱ्याला पिक पेरा भरण्यासाठी त्यांच्याजवळ स्मार्टफोन असायला हवा.
- शेतकऱ्याला त्याच्या स्मार्टफोन मध्ये e pik pahani हे एप डाउनलोड करून त्यांना रजिस्टर करावे लागेल.
- e pik pahani नोंदणी करताना एप मध्ये सांगेल ती माहिती योग्य त्या ठिकाणी भरून घ्या.
- ई पिक पेरा नोंदवण्यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही ती विनामुल्य आहे.
- संबधित शेतकऱ्याच्या स्मार्टफोन मध्ये gps असायला हवे.
- ई पिक पाहणी नोंद करताना त्य शेतकऱ्याला त्याच्या शेताच्या बांधावर जाऊन पेरलेला पेरा फोटो कडून अपलोड करता यावा किंवा करावा.
- पिक पाहणी नोद करण्यासाठी शासनाने दिलेल्या वेळेत करणे आवश्यक आहे वेळ निघून गेल्यावर त्याचा उपयोग नाही.किंवा ते ग्राह्य धरले जाणार नही
- संबधित अधिकारी तुमच्या क्षेत्राला भेट देतील त्याची तुम्हाला पूर्वकल्पना देण्यात येईल.
- पिक पेरा मध्ये तफावत आढळल्यास संबधित शेतकऱ्याला त्याबद्दल स्पष्टीकरण द्यावे लागेल.
e pik pahani maharashtra 2024, app dwonload नोंदणी करणे ,
एप चा वापर कसा करायचा किंवा माहिती कशी भरायची याची step by step प्रोसेस अपेन पाहणार आहोत.
- step1- प्रथम e pik pahani हे एप मोबाईल मधील ‘google play store‘ उपलब्ध आहे.ते डाउनलोड करा
- एप डाउनलोड केल्यावर “माझी शेती ,माझा सातबारा ,मीच नोंदवणार माझा पिक पेरा” असा मजकूर येईल हे पाहिलं पण म्हंटल तरी चालेल
- तुम्हाला त्या एप ची नवीन अपडेट इंस्तोल करावे लागेल, कारण नवीन व्हर्जन असेल तरच तुमची माहिती अपलोड होईल.
- तुमच्याकडे 4G किंवा 5G ,वायफाय फाष्ट चालणारे नेटवर्क असावे तरच ते एप व्यवस्थित चालेल.
- तुम्हाला कमीतकमी 2GB एवढी मेमोरी अपलोड करण्यास मुभा आहे.
- तुम्हाला तिसऱ्या पानावर कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते सांगितले आहे.
- शेतकरी स्तरावरील कालावधी सांगितला असेल १ऑगस्ट ते १५ सप्टेम्बर या कालावधीत पिक पेरा नोंदवला जाईल.
- चौथ्या पानावर तुम्हाला तुमच्या जमिनीवर योग्य माहिती अपलोड करणे गरजेचे आहे. ते म्हणजे कायम पड,चालू पड .नंतर पिक माहिती नोंदवा
- पिक माहिती नोंदवल्या नंतर तुमच्या जमिनीमध्ये बांधावर झाडांची संख्या नोदवा,
- हि सर्व माहिती अपलोड करा.
- यामध्ये शेतकऱ्याला कायम पड किंवा चालू पड नोंदवावी लागेल.
- पड माहिती भरताना वर दिलेल्या image मध्ये सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे.
- कायम पड किंवा चालू पड किती क्षेत्र आहे ते हे.आर यामध्ये नोंदवावी.
- या image मध्ये तुम्हाला पिकाचा वर्ग, झाडे असतील तर झाडांची नावे नमूद करावी.
- जल सिंचनाची साधने कोणती आहे ती तेथे SILECT करावी,
- सिंचन पद्धत काय आहे.लागवडीचा दिनांक नमूद करा
- या चित्रात तुम्हाला तारीख ,खाते क्रमांक,गात क्रमांक बांधावरची झाडे,झाडांची संख्या नोंदवणे गरजेचे आहे.
हि सर्व माहिती योग्य पद्धतीने भरणे शेतकर्याला आवश्यक आहे.यामध्ये माहिती अपडेट करताना काही अडचण आली तर ०२०२५७१२७१२ या ई पिक पाहणी हेल्पालाईन न. वर तुम्ही संपर्क करू शकता.
FAQ
१)ई पिक पाहणी कशी भरायची ?
ई पिक पाहणी भरण्यासाठी google play store वरून एप डाउनलोड करून त्यामध्ये योग्य माहिती भरून सबमिट करा.
2) ई पिक पाहणी भरायची last date कोणती आहे?
ई पिक पाहणी १ ऑगस्ट ते 15 सप्टेंबर पर्यंत भरू शकता.
3) ई पिक पाहणी चा हेल्पलाईन न. किती?
०२०२५७१२७१२ हा ई पिक पाहणी हेल्पालाईन न. आहे.